इरकुत्स्क (रशियन: Иркутск) हे रशिया देशाच्या इरकुत्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व सायबेरियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. इरकुत्स्क शहर पूर्व सायबेरियाच्या तैगा प्रदेशामध्ये येनिसेची उपनदी अंगाराच्या काठावर बैकाल सरोवरापासून ७२ किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार इरकुत्स्कची लोकसंख्या ५.८८ लाख इतकी होती.
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील इरकुत्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
बॅंडी हा इरकुत्स्कमधील एक लोकप्रिय खेळ आहे.
इरकुत्स्क
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?