अंगारा नदी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अंगारा नदी

अंगारा (रशियन: Ангара́) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील नदी येनिसेची प्रमुख उपनदी आहे. अंगारा नदी बैकाल सरोवरामध्ये उगम पावते. तेथून प्रथम उत्तरेस व त्यानंतर पश्चिमेस वाहत जाऊन ती येनिसे नदीला मिळते. एकूण १,७७९ किमी लांबीची अंगारा ही रशियातील सर्वात लांबीच्या नद्यांपैकी एक असून अंगारा, येनिसे व बैकालला पुरवठा करणारी सेलेंगा ह्या तीन नद्या मिळून जगातील सर्वात मोठ्या पाणलोट क्षेत्रांपैकी एक निर्माण झाले आहे.

रशियाच्या इरकुत्स्क ओब्लास्त व क्रास्नोयार्स्क क्राय ह्या प्रदेशांमधून वाहणाऱ्या अंगारावरील इरकुत्स्क हे सर्वात मोठे शहर आहे. येनिसेच्या दक्षिण व मध्य भागात जलविद्युतनिर्मिती करणारी अनेक मोठी धरणे बांधली गेली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →