चिता (रशियन: Чита) हे रशिया देशाच्या झबायकल्स्की क्रायचे मुख्यालय व सायबेरियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. चिता शहर पूर्व सायबेरियाच्या दक्षिण भागात प्रदेशामध्ये चिता व इंगोदा ह्या नद्यांच्या संगमावर इरकुत्स्क शहराच्या ९०० किमी पूर्वेस वसले आहे. चिताची स्थापना इ.स. १६५३ साली कोसॅक समूहामधील एका गटाने केली. २०२१ साली चिताची लोकसंख्या सुमारे ३.५ लाख इतकी होती.
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील चिता हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथील हिवाळे अत्यंत रूक्ष व कठोर असतात.
चिता (रशिया)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?