झबायकल्स्की क्राय (रशियन: Забайкальский Край) हे रशियाच्या संघाच्या सायबेरियन जिल्ह्यातील एक क्राय आहे. १ मार्च २००८ रोजी चिता ओब्लास्त व अगिन-बुर्यात स्वायत्त ऑक्रूग ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून झबायकल्स्की क्रायची निर्मिती करण्यात आली. झबायकल्स्की क्राय दक्षिण सायबेरियामध्ये चीन व मंगोलिया देशांच्या सीमेवर वसले आहे. चिता हे येथील मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झबायकल्स्की क्राय
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.