इब्न बतूता

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इब्न बतूता

इब्न बतूता (२५ फेब्रुवारी, १३०४;टॅंजियर, मोरोक्को - इ.स. १३६९:मोरोक्को; अरबी: أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة, अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता), किंवा फक्त मुहम्मद इब्न बतूता (محمد ابن بطوطة) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वांत महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते. तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल रिहला (शब्दशः भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आजही हे पुस्तक प्रमाण मानले जाते.

तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया, चीन या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो भारतातही आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →