इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२ व २००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम व २००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इटली राष्ट्रीय फुटबॉल संघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.