इंद्रभुवन (सोलापूर)

या विषयातील रहस्ये उलगडा.

इंद्रभुवन (सोलापूर)

==इंद्रभुवनचा इतिहास==

एकेकाळी महाराष्ट्रात चैथ्या क्रमांकावर आणि देशात बाराव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वोत्कृष्ट सुबक नक्षीकाम असलेली अत्यंत रेखीव, मनमोहक, देखणी इमारत म्हणजे इंद्रभुवन होय. अनेक स्थापत्य शास्त्रांच्या प्रमाणबद्ध मिश्रणातून साकार झालेली सुमारे 15 हजारपेक्षा जास्त चैरस फुटांची ही भक्कम साजिरी इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात उंचावर मोठया डौलाने उभी आहे. ही इंद्रभुवन इमारत स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. जगभरातील उत्कृष्ट इमारतींमध्ये त्याकाळी वापरण्यात आलेले अत्याधुनिक बांधकाम साहित्य या इमारतीत वापरण्यात आले आहे. राहण्यासाठी उभी केलेली ही प्रासादासारखी वास्तू बांधण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सर्वांत्कृष्ट व्हावी हे होय. जगभरातील अनेक देशात आप्पासाहेब वारद यांनी दौरे करून या इमारतीसाठी लागणाÚया सुबक आणि आकर्षक वस्तू आणल्या. ग्रॅनाईट, बेसाल्ट, शहाबादी दगडांपासून घडविलेल्या या वास्तूसाठी जगभरातील सर्वांत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →