विलिस टॉवर ही अमेरिकेच्या शिकागो शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. विलिस टॉवर अमेरिकेतील सर्वात उंच इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम इ.स. १९७४ साली पूर्ण झाले व तेंव्हापासुन इ.स. १९८८ पर्यंत विलिस टॉवर जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीत १०८ मजले आहेत व एकूण उंची ४४२ मीटर आहे. जेव्हा ही बांधली गेली त्यावेळी ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग होती. या बिल्डिंगचे पूर्वीचे नाव 'सिअर्स टॉवर' असे होते पण इ.स. २००३ साली 'सिअर्स, रीबक & कं.'चे 'सिअर्स' नावाचे अधिकार संपले पण नवीन नाव काही लागले नाही. मार्च इ.स. २००९ मध्ये विलीस ग्रुप होल्डिंग्स ली., या लंडनमधील कंपनीने याचे अधिकार घेतले आणि दिनांक १६ जुलै इ.स. २००९ रोजी सकाळी १० वाजता याचे नाव विलिस टॉवर असे अधिकृत रित्या बदलले. जगातील असंख्य 'सिअर्स टॉवर'च्या चाहत्यांसाठी हा एक धक्का होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विलिस टॉवर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.