इंदू सरकार हा २०१७ मधील भारतीय राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. याचे सह-लेखन, सह-निर्मिती आणि दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा अनिल पांडे आणि मधुर भांडारकर यांनी लिहिली असून संवाद संजय छेल यांनी लिहिले आहेत. इंदू सरकार भांडारकर एंटरटेनमेंट आणि मेगा बॉलीवूड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बॅनरखाली निर्मित आहे.
हा चित्रपट भारतातील आणीबाणीच्या काळावर, म्हणजे १९७५-७७ या १९ महिन्यांच्या कालावधीवर आधारित आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी, नील नितीन मुकेश, अनुपम खेर, तोटा रॉय चौधरी, नितांशी गोयल आणि सुप्रिया विनोद यांच्या भूमिका आहेत. अनु मलिक आणि बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट २८ जुलै १०१७ रोजी काही कटांसह प्रदर्शित झाला.
इंदू सरकार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.