इंतर्नास्योनाल (फ्रेंच: L'Internationale) हे जगभरातल्या डाव्या विचारधारेशी जोडलेल्या लोकांसाठी १९व्या शतकाच्या शेवटच्या काळापासूनचे एक प्रेरक गीत आहे. फ्रेंच भाषेत 'इंतर्नास्योनाल' ह्या शब्दाचा अर्थ 'आंतरराष्ट्रीय' असा होतो. (ह्याचा इंग्रजीमध्ये 'इंटरनॅश्नाले' असा अपभ्रंश झाला आहे.) ह्या गाण्याचा केंद्रीय संदेश असा आहे की जगभरातले लोक एक सारखेच आहेत आणि म्हणून त्यांनी एकत्र येऊन अत्याचाराविरोधात संघर्ष केला पाहिजे.
हे गीत मूळ रूपात इ.स. १८७१ मध्ये युझैन पोतिये (Eugène Pottier) द्वारा फ्रेंच भाषेत लिहिले गेले होते. पण त्यानंर ह्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. हे गाणे बरेचदा उजव्या किंवा डाव्या हाताची वळलेली मूठ सलामीच्या रूपात उंचावून गायले जाते.
इंतर्नास्योनाल
थोडक्यात पण महत्त्वाचे.