इंडिपेन्डन्स पास तथा हंटर पास हा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक उंच घाट आहे. ३,६८७ मी १२,०९५ फूट) उंचीवरून जाणारा हा घाटरस्ता रॉकी पर्वतांच्या सावाच पर्वतरांगेमधील खंडीय विभाजन रेखा ओलांडतो. हा रस्ता ॲस्पेन आणि ट्विन लेक्स जोडतो. या घाटाचा माथा पिटकिन आणि लेक काउंटीच्या सीमेवर आहे.
हा घाटरस्ता अंदाजे ५१ किमी (३२ मैल) लांबीचा असून त्याच्या दोन्ही टोकांना गरजेनुसार वाहतूक रोखण्यासाठी फाटके लावलेली आहेत. कॉलोराडो ८२ हा महामार्ग या रस्त्यावरून पूर्वेस २९ किमी (१८ मैल) अंतरावरील ट्विन लेक्स आणि ३१ किमी (१९ मैल) पश्चिमेस असलेल्या ॲस्पेन शहराला जोडतो. ॲस्पेनच्या पलीकडे महामार्ग रोअरिंग फोर्क नदीकाठाने दरी उतरत ग्लेनवुड स्प्रिंग्ज येथील कॉलोराडो नदी पर्यंत जातो. पूर्वेस हा महामार्ग ट्विन लेक्स पासून २४ किमी (१५ मैल) अंतरावर लेडव्हिलच्या दक्षिणेस यूएस २४ महामार्गाला मिळतो.
हा घाट तीव्र चढाचा असून माथ्याच्या दोन्ही बाजूंना ६ टक्के उतार आणि पुढे-मागे करीत जाणारे रस्त्यांशिवाय हा चढणे अशक्य आहे. पश्चिमेकडील उतार कॉलोराडोची उपनदी असलेल्या रोअरिंग फोर्क नदीच्या अरुंद दरीतून खाली उतरत जातो. रोअरिंग फोर्क नदी घाटाच्या पश्चिमेला असलेल्या इंडिपेन्डन्स लेकमधून उगम पावते. पूर्वेला हा रस्ता लेक क्रीकच्या उत्तर प्रवाहाच्या बाजूने ट्विन लेक्स सरोवरापर्यंत जातो. लेक क्रीक पूर्वेला पुढे आर्कान्सा नदीला मिळते.
या घाटातून होणाऱ्या वाहतूकीवर कॉलोराडो वाहतूक विभाग (सी-डॉट) नजर ठेवतो. अनेकदा महामार्ग ८२ चा वापर बंद केला जातो. हिवाळ्यामध्ये हा रस्ता सामान्यतः पहिल्या मोठ्या हिमवर्षावानंतर किंवा ७ नोव्हेंबरपर्यंत बंद केला जातो (काही अपवाद आहेत.) मे महिन्याच्या अखेरीस मेमोरियल डे वीकांताच्या आधी साचलेला बर्फ वितळायला लागतो. तेव्हा जसजसे रस्त्यावरून बर्फ बाजूला करणे आणि आणि दुरुस्त करणे शक्य होतो तसतसे सी-डॉट हा रस्ता पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षांत हिवाळा हलका असल्या हा घाट मे महिन्याच्या मध्यातही उघडला जातो. इंडिपेन्डन्स घाट बंद असताना ॲस्पेन शहराला पूर्वेकडून जाण्याचा मार्ग नसतो ग्लेनवुड स्प्रिंग्जपासून रोअरिंग फोर्कच्या दरीतील महामार्ग ८२ हा तेथील व्यस्त स्की हंगामात शहराकडे जाणारा एकमेव मार्ग उरतो.
घाटरस्ता सुरू होत असतानाही सर्व वाहने कॉलोराडो ८२ महामार्गाने जाऊ शकत नाहीत. मोठ्या आकाराच्या (१२ मी) आणि जास्त वजनाच्या वाहनांना या घाटातून जाण्यास कायमची मनाई आहे. यामुळे ट्रॅक्टर ट्रेलर, बस आणि तत्सम वाहने हा घाट वापरु शकत नाहीत.
इंडिपेन्डन्स घाटातून गाडी चालवणे अवघड आहे. दोन्हीकडून उंच डोंगर चढावा लागत असल्याने दोन्हीकडून ६% तीव्रतेचा उतार करायला लागला आहे. येथील अनेक यू-पिन वळणांवरून १५ किमी (१० मैल) प्रतितास गतीमर्यादा घातलेली आहे. घाटाच्या पश्चिमेकडील उतारावर अनेकदा दरडी कोसळतात. त्यामुळे कमीत कमी डोंगर फोडून फक्त १२ फूट (३.७ मी) रुंदीचा रस्ता तयार केला आहे. येथून नेहमी एकेरी वाहतूक शक्य असते. पूर्व उतारावर ट्विन लेक्सकडून येताना दरडी कोसळल्यामुळे अनेकदा रस्ता तात्पुरता बंद करावा लागतो. कॅम्पग्राउंड्स आणि इतर पडावांमधून वाहने वारंवार अनपेक्षितपणे रस्त्यावर येतात. सायकलस्वार कॉलोराडो ८२चा वापर करतात.
या घाटातील हवामान अनिश्चित असते. ट्विन लेक्समध्ये ऊन असले तरी घाटात धुके, पाऊस किंवा हिमवर्षावही होत असतो. परिस्थितीपेक्षा बरेच वेगळे असू शकते. स्वच्छ दिवशी सुद्धा अचानक गडगडाटासह वीजा पडून वादळे होऊ शकतात. या भागात आणि वर्षभर कधीही बर्फवृष्टी होऊ शकते. सी-डॉटने याबद्दल सावधान राहण्याचे अनेक संदेश आणि पाट्या रस्त्यावर लावलेल्या आहेत.
इंडिपेन्डन्स पास
या विषयातील रहस्ये उलगडा.