इंटरस्टेट ७० तथा आय-७० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यातून पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता मेरिलँड राज्यातील बाल्टिमोर शहराला युटा राज्यातील कोव्ह फोर्ट गावाशी जोडतो. हा महामार्ग रॉकी पर्वतरांगेच्या पूर्वेला साधारणपणे यू.एस. ४० या आधी अस्तित्त्वात असलेल्या महामार्गावरून किंवा समांतर बांधलेला आहे तर रॉकी पर्वतरांगेतून आणि पश्चिमेस अनेक छोट्या रस्त्यांच्या वाटेवरून बांधलेला आहे.
आय-७०चा कॅन्सस आणि मिसूरीमधील एक भाग इंटरस्टेट सिस्टमचा बांधलेला पहिला भाग असल्याचे समजले जाते. फेडरल हायवे अॅडमिनिस्ट्रेशन अनुसार कॉलोराडोच्या ग्लेनवूड कॅन्यनमधून काढलेला रस्ता इंटरस्टेट सिस्टमच्या मूळ आखणीतील शेवटचा टप्पा होता. रॉकी पर्वतांमध्ये कॉन्टिनेन्टल डिव्हाइड पार करण्यासाठी बांधलेला आयझेनहोवर बोगदा ११,१५८ फूट (३,४०१ मी) उंचीवर असून संपूर्ण इंटरस्टेट सिस्टममधील हा सर्वोच्च बिंदू आहे.
इंटरस्टेट ७०
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.