इंटरस्टेट ९४

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

इंटरस्टेट ९४ तथा आय-९४ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता मॉंटाना राज्यातील बिलिंग्स शहराजवळ सुरू होऊन मिशिगन राज्यातील पोर्ट ह्युरॉन शहरापर्यंत जातो. तेथे ब्लू वॉटर ब्रिज या पूलावर हा महामार्ग कॅनडाच्या महामार्ग क्र. ४०२ला मिळतो. अमेरिकेतील पूर्व-पश्चिम इंटरस्टेट महामार्गांपैकी हा एकच रस्ता कॅनडाशी थेट संधान बांधतो.

हा महामार्ग १,५८५.२० मैल (२,५५१.१३ किमी) लांबीचा असून तो मॉंटाना, नॉर्थ डकोटा, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगन राज्यांतून जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →