इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८८ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियामध्ये युरोपियन वसाहती स्थापन झाल्याच्या २००व्या वर्षापुर्ती निमित्त इंग्लंडने हा दौरा केला. एकमेव कसोटी सामना द ॲशेस अंतर्गत धरण्यात आला नाही. एकमेव कसोटी अनिर्णित राहिली तर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने २२ धावांनी जिंकला.
ही मालिका खेळून झाल्यावर लगेचच इंग्लंडचा संघ ३ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडसाठी रवाना झाला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?