आर्टिकल ३७० हा २०२४ चा आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित भारतीय हिंदी-भाषेतील राजकीय ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यांनी आदित्य धर, अर्जुन धवन आणि मोनल ठक्कर यांच्यासोबत चित्रपटाचे सह-लेखन केले. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, वैभव तत्ववादी, अरुण गोविल आणि किरण करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. समीक्षकांनी गौतमच्या कामगिरीची प्रशंसा केली. परंतु वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याबद्दल, आगामी निवडणुकांमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कथन दर्शविल्याबद्दल आणि काश्मिरींच्या मतांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्टिकल ३७० (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.