आरामबाग लोकसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

आरामबाग हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील आरामबाग शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ हूगळी जिल्ह्यामध्ये तर एक मतदारसंघ पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये आहेत. २००९ सालापासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

आरामबाग लोकसभा मतदारसंघ २००९ सालापर्यंत कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनिल बसू येथून १९८४ ते २००९ दरम्यान सलग सात वेळा निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →