आराऊ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आराऊ ( जर्मन: [ˈAːraʊ], स्विस जर्मन: [Ɑːræu̯] ) एक गाव आहे, एक नगरपालिका, आणि उत्तरेतील आर्गाउ राज्याची (कॅंटन) राजधानी आहे. हे शहर आराऊ जिल्ह्याची राजधानी देखील आहे. हे शहर जर्मन भाषिक आणि प्रामुख्याने प्रोटेस्टंट आहे. आराऊ स्विस पठारावर, आरे खोऱ्यात नदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे. हे जुरा पर्वतच्या दक्षिणेकडील पायथ्याजवळ आहे. हे झ्युरिक शहराच्या पश्चिमेस आणि बर्नच्या ईशान्य दिशेला ६५ किलोमीटर (४० मैल) अंतरावर आहे. नगरपालिका सोलथर्नच्या कॅन्टॉनच्या पश्चिम सीमेजवळ आहे. हे आर्गाउ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या सुरुवातीला रोहर हा आराऊचा जिल्हा बनला.

आराऊची अधिकृत भाषा स्विस जर्मन आहे, परंतु मुख्य बोली असणारी ही भाषा अलेमॅनिक स्विस जर्मन बोली भाषेचे स्थानिक रूप आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →