लिमाट नदी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

लिमाट नदी

लिमाट स्वित्झर्लंडमधील एक नदी आहे. नदीची सुरुवात झ्युरिक सरोवरातून होते. हे सरोवर झ्युरिक शहराच्या दक्षिणेकडील भागात आहे. झ्युरिकपासून ती नदी उत्तर-पश्चिम दिशेला वाहते ही नदी ३५ किलोमीटर (२२ मैल) पुढे गेल्यानंतर आरे नदीला मिळते. हा संगम लहानशाब्रुग शहराच्या उत्तरेस आहे..

लिमाटच्या खोऱ्यात झ्युरिकच्या नंतर डायटिकॉन, वेटिंगन आणि बाडेन ही मुख्य शहरे येतात. लिमाट नदीच्या मुख्य उपनद्या लिंथ, वागीटलर आ आणि जोना या आहेत. या सर्व झ्यूरिक लेकशी निगडीत आहेत.

या नदीचा उल्लेख प्रथम ८ व्या शतकात सापडतो. त्यावेळेस याचे नाव लिंडिमाकस असे होते. या नावाचा संबंध गॉलियनशी आहे. यात लिंडो म्हणजे लेक (वेल्श इलिन) आणि मॅगोस म्हणजे सपाट (वेल्श मेस) असा आहे. आणि त्यामुळे बहुधा याचे मूळ नाव लिंथ असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →