आयएनएस विक्रांत तथा इंडीजिनस एरक्राफ्ट कॅरियर (आयएसी-१) ही भारतीय आरमाराचे नियोजित विमानवाहू नौका आहे. भारताता बांधलेली ही पहिली विमानवाहू नौका कोच्ची गोदीमध्ये बांधली जात आहे. या नौकेची बांधणी १९९९मध्ये सुरू झाली आणि डिसेंबर २०११मध्ये हिच्या सांगाड्याचे जलावतरण करण्यात आले. १२ ऑगस्ट, २०१३ रोजी याची बाहेरील बांधणी पूर्ण केली गेली. २०२१ साली या नौकेच्या चाचण्या सुरू होउन ही नौका भारतीय २०२३ साली आरमारात दाखल होण्याचा अंदाज आहे.
ही नौका बांधण्यासाठी १९३ अब्ज ४१ कोटी रुपयांचा (अंदाजे २.८ अब्ज अमेरिकन डॉलर) खर्च होणे अपेक्षित आहे.
आयएनएस विक्रांत (२०१३)
यामागील विज्ञान आणि इतिहास.