आयएनएस विक्रांत (आर ११)

या विषयावर तज्ञ बना.

आयएनएस विक्रांत (आर ११)

आय.एन.एस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. याचे जलावतरण सप्टेंबर २२, १९४५ रोजी झाले. जानेवारी १९५७च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →