आफ्रिकन म्हैस (सिनेरस कॅफर) हा एक म्हशीचा प्रकार असून, हा एक मोठा उप-सहारा आफ्रिकन गोवंश आहे. सिनेरस कॅफर कॅफर, किंवा केप म्हैस ही विशिष्ट उपप्रजाती असून ही दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत आढळणारी सर्वात मोठी प्रजाती आहे. सिनेरस कॅफर नानस (जंगली म्हैस) ही सर्वात लहान उपप्रजाती आहे, जी मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या वनक्षेत्रात दिसून येते, तर सिनेरस कॅफर ब्रॅकिसेरस पश्चिम आफ्रिकेत दिसून येते आणि S. c. aequinoctialis पूर्व आफ्रिकेतील सवानामध्ये आहे. प्रौढ आफ्रिकन म्हशीची शिंगे ही त्याची खास वैशिष्ट्य आहेत. यांची शिंगे मुळाशी जाड, रुंद आणि जोडलेले असतात. यामुळे डोक्याच्या वरच्या बाजूला एक हाडांची ढाल तयार होते ज्याला "बॉस" म्हणून संबोधले जाते. हा आफ्रिकन खंडातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो आणि एका अंदाजानुसार ते दरवर्षी २०० पेक्षा जास्त लोकांचे तुडवून आणि शिंगाने मारून प्राण घेतात.
आफ्रिकन म्हैस आणि पाळीव म्हैस यांचा फारसा संबंध नसून, ती फक्त इतर मोठ्या गोवंशाशी संबंधित आहे. आफ्रिकन म्हशीला त्याच्या आशियाई समकक्ष, पाण म्हशीच्या विपरीत, कधीही पाळीव करण्यात आले नाही. याचे कारण कदाचित त्यांचा जंगली स्वभाव असू शकतो. प्रौढ आफ्रिकन म्हशींच्या नैसर्गिक भक्षकांमध्ये सिंह, तरस आणि मोठ्या मगरींचा समावेश होतो.
आफ्रिकन म्हैस ही शरीराने अतिशय मजबूत प्रजाती आहे. त्याची खांद्याची उंची १.० ते १.७ मी (३.३ ते ५.६ फूट) पर्यंत असू शकते. त्याची डोके आणि शरीराची लांबी १.७ ते ३.४ मी (५.६ ते ११ फूट) पर्यंत असू शकते. तर शेपटी ७० ते ११० सेंमी (२८ ते ४३ इंच) पर्यंत लांब असू शकते. इतर मोठ्या बोव्हिड्सच्या तुलनेत, यांचे शरीर लांब आणि धष्टपुष्ट असून शरीराची लांबी जंगली पाण म्हशीपेक्षा जास्त असू शकते. लहान परंतु जाड पाय असल्याने परिणामी तुलनेने उंची कमी असते. केप म्हशींचे वजन ४२५–८७० किलो (९४०–१,९०० पौंड), सामान्यतः मादीपेक्षा मोठे नर रेडे, जास्त वजनदार असतात. तर तुलनेत, आफ्रिकन जंगली म्हशी, २५०–४५० किलो (६००–१,००० पौंड), फक्त अर्ध्या आकाराच्या असतात. यांचे डोके आकाराने छोटे असून बॅकलाइनच्या खालच्या पातळीवर असते. म्हशीचे पुढचे खुर मागील खुरांपेक्षा जास्त रुंद असतात. शरीराच्या पुढच्या भागाच्या वजनाला आधार देण्याची गरज अधिक असते. कारण यांच्या शरीराचा पुढचा भाग मागच्या भागापेक्षा जड आणि अधिक शक्तिशाली असतो.
सवाना प्रकारच्या म्हशींचा कातडीचा रंग वयानुसार काळा किंवा गडद तपकिरी असतो. प्रौढ नराच्या डोळ्याभोवती आणि चेहऱ्यावर अनेकदा पांढरी वर्तुळे दिसून येतात. तर म्हशींच्या कातडीस जास्त लाल रंग असतो. वन प्रकारातील म्हशी ३०-४०% लहान, तांबूस तपकिरी रंगाच्या, कानाभोवती जास्त केस वाढलेल्या आणि मागे व किंचित वर वळलेल्या शिंगांसह असतात. दोन्ही प्रकारच्या वासरांना लाल फर असतो.
प्रौढ नर आफ्रिकन म्हशीच्या शिंगांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे मूळ एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एक ढाल बनवतात ज्याला "बॉस" म्हणतात. बुडापासून शिंगे खालच्या दिशेने वळतात, नंतर वरच्या दिशेने आणि बाहेरच्या दिशेने वळतात आणि काही प्रकरणांमध्ये आतील बाजूस किंवा मागे जातात. मोठ्या रेड्यामध्ये, शिंगांच्या टोकांमधील अंतर एक मीटरच्या वर पोहोचू शकते (विक्रमी नोंद ६४.५ इंच किंवा १६४सेमी आढळून आली). जेव्हा म्हैस ५ ते ६ वर्षांची होते तेव्हा शिंगे पूर्णपणे तयार होतात, परंतु ८ ते ९ वर्षांचे होईपर्यंत बॉस कठीण होत नाहीत. मादीची शिंगे नराच्या सरासरी १० ते २०% लहान असतात आणि त्यांना बॉस नसतो. वन-प्रकारच्या म्हशींची शिंगे दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतील सवाना-प्रकारच्या म्हशींपेक्षा लहान असतात, साधारणतः ४० सेंटीमीटर (१६ इंच) पेक्षा कमी असतात, आणि जवळजवळ कधीही बुडाशी जुळलेले नसतात.
आफ्रिकन म्हैस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?