आदिलशाही हे इ.स. १४९० ते १६८६ या काळात विजापूरच्या सल्तनतीवर राज्य करणाऱ्या शिया राजघराण्याचे नाव होते. विजापूर ही इ.स. १४९० पासून बहामनी सल्तनतीच्या विघटनातून उदयास आलेल्या पाच दख्खन सल्तनतींपैकी एक होती.
आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता, त्यामुळे विजापूर येथे या नव्या राज्याची राजधानी होती.युसुफ आदिल शाह बहुधा ऑटोमन सुलतान मुराद दुसरा याचा वंशज असावा.आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.१२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला.
आदिलशाही
यामागील विज्ञान आणि इतिहास.