आत्माराम सावंत

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आत्माराम कृष्णाजी सावंत (७ मार्च, इ.स. १९३३: हुमरस , आकेरिकुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठीतले लेखक, नट, नाटककार, दिग्दर्शक, पत्रकार होते. ते कामगार रंगभूमीवरून व्यावसायिक नाटकांत आले.

बालपण कोकणात गेल्यामुळे आत्माराम सावंतांना लहानपणापासून कीर्तनाची व गणपतीत होणाऱ्या मेळ्यांची आवड होती. त्यांचेवडील सामान्य शेतकरी होते. त्यांनी आत्मारामला मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन चाकरीसाठी मुंबईला धाडले. मुंबईत आल्यावर आत्माराम सावंत नव्यानेच सुरू झालेल्या कामगार नाट्यस्पर्धेत सहभागी होऊ लागले. इ.स. १९५३ ते इ.स. १९६० या काळात त्यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी अनेक कौटुंबिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि काही पारितोषिकेही मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →