आगरताळा विमानतळ (आहसंवि: IXA, आप्रविको: VEAT) हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील एक विमानतळ आहे. त्रिपुरा राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात. १९४२ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ आगरताळा शहराच्या १२ किमी वायव्येस भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित आहे. आजच्या घडीला येथून भारताच्या इतर प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आगरताळा विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.