त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोरम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रिपुरा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?