नागालँड

या विषयातील रहस्ये उलगडा.

नागालॅंड उच्चार हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमी व चॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →