आगगाडी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

आगगाडी हे लोखंडी रुळांवरून चालणारे आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहन आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व रुळांवरून धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेणाऱ्या वाहनाला आगगाडी म्हणतात. हे रूळ बहुधा पोलादी असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, कॉंक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.

पूर्वी रेल्वेगाड्या कोळशाच्या इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला आगगाडी असे म्हणू लागले. आज बहुतेक रेल्वेगाड्या डिझेल, पेट्रोल व वीज इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →