मोनोरेल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मोनोरेल

मोनोरेल ही एका रुळाच्या आधाराने रुळाच्या बाजूने, रुळावरून किंवा रुळाला लटकून धावणारी आगगाडी किंवा तिची परिवहन प्रणाली आहे. या प्रणालीतील रूळ सामान्य लोहमार्गात वापरल्या जाणाऱ्या रुळासारखा लोखंडी असतो किंवा कॉंक्रीटच्या तुळईसारखा असतो. या रुळाला किंवा तुळईला घट्ट धरून किंवा त्यावरून या प्रणालीतील वाहने, अर्थात डबे, सरपटत जातात. अशा प्रणालीतील तुळईला देखील मोनोरेल असे संबोधले जाते. पूर्वी मोनोरेलमध्ये लोखंडी रूळ वापरत. इ.स. १८९७ च्या सुमारास मोनो (एकेरी) आणि रेल (लोखंडी रूळ) या शब्दांपासून मोनोरेल शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचे आढळते. ही परिवहन प्रणाली रेल्वे या वर्गात मोडते. मोनोरेल या संज्ञेशी जमिनीपासूनच्या उंचीचा संबंध नसून, प्रामुख्याने एकेरी मार्गिकेच्या आधारावर चालणारी प्रणाली या संकल्पनेशी आहे. जगातील काही शहरांमधे मोनोरेल जमिनीलगत किंवा भुयारातून देखील धावताना आढळतात . सेयफिज प्रकारच्या उभारणींमधे मोनोरेलचे डबे तुळई किंवा रुळाच्या वरून न सरकता त्यावरून लटकवलेले असतात (उदा. जपान मधील चिबा अर्बन मोनोरेल).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →