लघुभार रेल्वे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लघुभार रेल्वे

लघुभार रेल्वे ही काही शहरे आणि उपनगरीय भागात वापरीत असलेली सार्वजनिक जलद वाहतूक सेवा आहे. या प्रणालीत वापरलेली वाहने नियमित आगगाड्यांपेक्षा हलकी आणि कमी प्रवाशी क्षमतेची असतात, परंतु पारंपारिक ट्रॅमपेक्षा अधिक शक्तिशाली आणि जास्त प्रवाशी क्षमता असलेली असतात. यामध्ये सहसा वेगळे मार्गाधिकार/रूळ असतात आणि अनेक ठिकाणी इतर वाहतुकीसह सामान्य शहरातील रस्त्यांवर चालतात.

आजकाल, सामान्यतः या प्रणालीतील विजेवर चालतात. काही पर्वतीय लघुभार रेल्वे गाड्या ट्रॅक्शनवर देखील चालतात.

लघुभार रेल्वे वाहतुकीमध्ये जलद वाहतूक वैशिष्ट्ये आणि प्रवासी रेल्वे वैशिष्ट्ये या दोन्ही प्रणालींचे फायदे असतात. जलद वाहतूक सारखी वैशिष्ट्ये असलेल्या लघुभार रेल्वे प्रणालींना लघुभार मेट्रो म्हणतात. अलिकडच्या काळात, जगाच्या अनेक भागांमध्ये आढळणाऱ्या लघुभार रेल्वे प्रणाली अधिकाधिक लोकप्रिय झाल्या आहेत; अवजड गाड्यांपेक्षा या प्रणाली बांधण्यासाठी लागणारी गुंतवणूक आणि चालू खर्च कमी लागतो आणि या प्रणालीत विश्वसनीयता जास्त असते. या सांगोल्या कारणांमुळे बऱ्याची वेळी या प्रणालीला इतर जलद परिवहन पद्धतींपेक्षा अनेक सरकारांने जास्त पसंत केल्याचे दिसून येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →