आइसलॅंडएर ही आइसलॅंडची प्रमुख विमानवाहतूक कंपनी आहे. रेक्याविकच्या हाफनारफ्योर्डुर भागात मुख्यालय असलेली ही कंपनी १६ देशांतील ३९ शहरांना विमानसेवा पुरवते. हिचे मुख्य ठाणे रेक्याविक केफ्लाविक विमानतळावर आहे. या कंपनीचा विमानताफा मुख्यत्वे बोईंग ७५७-२००/३०० विमानांचा असून याशिवाय त्यात दोन बोईंग ७६७ विमाने आहेत. आइसलॅंडएरने सोळा बोईंग ७३७ मॅक्स विमानांची मागणी नोंदवलेली आहे. या सगळ्या विमानांना आइसलॅंडमधील ज्वालामुखींची नावे दिलेली आहेत.
आइसलॅंडएर एर आइसलॅंड, आइसलॅंडएर कार्गो आणि लॉफ्टलाइडीर-आइसलॅंडिक या उपकंपन्या चालवते.
अटलांटिक पुलावरील आइसलँडच्या भौगोलिक स्थानामुळे एक थांब्यानिशी अटलांटिकपार उड्डाणे सोयीची होतात. आइसलँडएरने आपले मार्गजाळे विणताना याचा फायदा घेतला आहे.
आइसलँडएर
यामागील विज्ञान आणि इतिहास.