असिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന് തോട്ടുങ്കല് ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात) ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगूतील सुरुवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते. असिन ही केरळ राज्याच्या युथ आयकॉनची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे.
तेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारम व हिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट.हा तमिळ, त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला.
असिन तोट्टुंकल
यामागील विज्ञान आणि इतिहास.