भूमिका चावला

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भूमिका चावला

भूमिका चावला (इंग्लिश: Bhumika Chawla ; तेलुगू: భూమిక చావ్లా ; तमिळ: பூமிகா சாவ்லா ; मल्याळम: ഭൂമിക ചാവ്‌ല) (ऑगस्ट २१, १९७८, नवी दिल्ली) या नावाने ओळखली जाणारी रचना चावला ही तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री आहे. २००० सालचा तेलुगू चित्रपट युवकुडु या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगूसोबतच मल्याळम, तमिळ, हिंदी, पंजाबी व भोजपुरी भाषांतील चित्रपटांत काम केले. ती तिच्या कुशी, तेरे नाम, मिसाम्मा, सत्यभामा आणि गांधी माय फादर या चित्रपटांतील भूमिकांसाठी विशेष नावाजली जाते. भूमिकेचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिने दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले. मॉडेलिंग व चित्रपटात काम करण्यासाठी ती पुढे मुंबईत हलली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →