अश्विनी भिडे (जन्म: २५ मे १९७०) या एक भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत, ज्या मुख्यतः एक्वा लाईन किंवा मुंबई मेट्रोची लाईन ३ वरील कामासाठी ओळखल्या जातात. त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL)चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले, जो भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. २०१५ पासून २०२० पर्यंत त्यांनी हे काम केले.
जानेवारी २०२० मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यातील इतर 20 IAS अधिकाऱ्यांसह त्यांची बदली केली. नवीन सरकार अस्तित्वात आल्यावर, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी आरे मिल्क मेट्रो कारशेडच्या बांधकामातील मतभेदांचे कारण देत भिडे यांच्या बदलीची मागणी केली होती.
अश्विनी भिडे
थोडक्यात पण महत्त्वाचे.