अल्मा (कॉलोराडो)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अल्मा (कॉलोराडो)

अल्मा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव पार्क काउंटीमध्ये असून येथील लोकसंख्या २७० आहे. अल्मा ब्रेकेनरिज आणि फेरप्ले गावांच्यामध्ये कॉलोराडो ९ वर वसलेले आहे.

अल्मा ३,२२४ मीटर (१०,५७८ फूट) उंचीवर आहे. हे गाव अमेरिकेमधील कायम वस्ती असलेले सगळ्यात उंचीवरचे गाव आहे. या गावाची स्थापना २ डिसेंबर, १८७३ रोजी मिस्टर जेम्स या व्यापाऱ्याने केली. त्याने या गावाला आपल्या बायको किंवा मुलीचे नाव दिले.

हे गाव रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेच्या पायथ्याशी असून येथून अनेक स्की रिसॉर्ट व गिरिभ्रमणमार्ग जवळ आहेत. डिकॅलिब्रॉन या १४,००० फूटांची चार शिखरे पार करणारा मार्ग येथून जवळ असलेल्या काइट लेकपासून सुरू होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →