अलेक्झांड्रा डेव्हिड-नील (लुईस युजेनी अलेक्झांड्रीन मेरी डेव्हिड) (जन्म २४ ऑक्टोबर १८६८ - ०८ सप्टेंबर १९६९) या बेल्जियन-फ्रेंच प्रवासी, अध्यात्मवादी, बौद्धधर्मी, ऑपेरा गायक आणि लेखिका होत्या. १९२४ मध्ये ल्हासा, तिबेट येथे त्यांनी भेट दिली तेव्हा त्या विशेष प्रसिद्ध झाल्या कारण तेव्हा तेथे परदेशी लोकांना भेट देण्यास मनाई होती. डेव्हिड-नील यांनी पौर्वात्य धर्म, तत्त्वज्ञान आणि तिबेटमधील जादू आणि रहस्य यासह त्यांच्या प्रवासाविषयी ३० हून अधिक पुस्तके लिहिली, १९२९ मध्ये ती पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या शिकवणीचा प्रभाव लेखक जॅक केरोआक आणि ॲलन गिन्सबर्ग, पौर्वात्य तत्त्वज्ञान लोकप्रिय करणारे लेखक ॲलन वॉट्स आणि राम दास आणि गूढवादी बेंजामिन क्रेम यांच्यावर झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलेक्झांड्रा डेव्हिड-नील
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.