अलन्या जिल्हा हा तुर्किये देशातील दक्षिणेकडील किनारपट्टीवरील असलेल्या अंताल्या प्रांताचा एक घटक जिल्हा आहे. देशाच्या भूमध्य प्रदेशात, १३८ किलोमीटर (८६ मैल) अंतरावर अंताल्या प्रांताच्या पूर्वेस वसलेला आहे. याचे पूर्वीचे नाव अलैये असे होते. तुर्कीच्या २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ९८,६२७ होती. या शहराच्या आणि त्याच्या अंगभूत क्षेत्राचा समावेश असलेल्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,५९८.५१ चौरस किमी (६१७.१९ चौ. मैल) आहे.
हा जिल्हा टौरस पर्वताच्या पायथ्याशी भूमध्य समुद्रातील छोट्या द्वीपकल्पावर आहे. हे स्थान अतिशय मोक्याचे असल्यामुळे हा टॉलेमिक, सेल्युसिद, रोमन, बायझेंटाइन आणि ओस्मानी अशा या साम्राज्यांसाठीचे व्यूहात्मक महत्वाचा होता. अलन्या चे सर्वात मोठे राजकीय महत्त्व मध्ययुगात अलेद्दिन काकबद प्रथमच्या शासनाखाली रामच्या सेल्जुक सुलतानाबरोबर होते, या शहराचे नाव अलेद्दिन काकबद प्रथमच्या नावावरूनच ठेवले आहे. त्याने बांधलेल्या इमारती उदा. काझल कुळे (रेड टॉवर), तर्साने (शिपयार्ड) आणि अलन्या कॅसल या आजही महत्त्वाच्या शहरातील महत्त्वाच्या इमारती आहेत.
अलन्या कडे भूमध्य हवामान, नैसर्गिक आकर्षणे आणि ऐतिहासिक वारसा असल्यामुळे पर्यटनासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण झाले आहे. तुर्की देशाच्या नऊ टक्के पर्यटन उत्पन्न याचे क्षेत्रातून येते. या क्षेत्रात तुर्कीमधील तीस टक्के जमीन परदेशी नागरिकांनी खरेदी केलेली आहे. इ.स. १९५८ पासून या भागात पर्यटन वाढले. पर्यटन हे या शहरातील प्रमुख उद्योगधंदा झाला. परिणामी या शहराची लोकसंख्या वाढली. अलन्यामध्ये दरवर्षी उबदार-हवामानाचे क्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सव होतात. इ.स. २०१४ मध्ये नॅशनलिस्ट मुव्हमेंट पार्टीचे अॅडम मुरत येसेल नगराध्यक्ष झाले. त्यांनी जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीच्या हसन सिपाहीओलु यांना हरवले. हसन सिपाहीओलु इ.स. १९९९ पासून शहराचे नगराध्यक्ष होते.
अलन्या जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.