ॲथेन्स

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ॲथेन्स

अथेन्स (ग्रीक: Αθήνα) ही दक्षिण युरोपाच्या ग्रीस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ३,४०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहरांपैकी एक आहे. इ.स. पूर्व पाचव्या व चौथ्या शतकांदरम्यान शास्त्रीय कला, शिक्षण, तत्त्वज्ञान इत्यादींचे माहेरघर असलेल्या अथेन्स येथेच आधुनिक लोकशाहीची रुजवात झाले असे मानले जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल इत्यादी सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ व गणितज्ञ ह्याच काळात अथेन्समध्ये कार्यरत होते. उज्वल इतिहासाच्या खुणा अथेन्समध्ये आजही जागोजागी आढळतात. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले अ‍ॅक्रोपोलिस तसेच पार्थेनॉन ह्या अथेन्समधील सर्वाधिक प्रसिद्ध वास्तू आहेत.

आधुनिक काळातील ग्रीसची राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक राजधानी असलेले अथेन्स हे एक जागतिक शहर आहे. २०११ साली अथेन्सची लोकसंख्या सुमारे ६.५५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.८३ लाख इतकी आहे. एका सर्व्हेक्षणानुसार २००८ साली अथेन्स जगातील ३२व्या क्रमांकाचे श्रीमंत व २५व्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →