अमोल मिटकरी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अमोल रामकृष्ण मिटकरी ( १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे. ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →