अमृता प्रीतम (३१ ऑगस्ट, १९१९ - ३१ ऑक्टोबर, २००५) या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. त्यांनी पंजाबी आणि हिंदी भाषां मध्ये लिखाण केले होते.
प्रीतम यांचा जन्म १९१९ मध्ये भारतातल्या पंजाब राज्यातील गुजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
अमृता प्रीतम यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमृता प्रीतम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?