अमळनेर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अमळनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो. अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठावर वसलेले असून. नदीकिनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. अमळनेर तालुक्यातून वाहणारी सूर नदी ही आणखी एक नदी आहे. बोरी आणि सूर या दोन्ही नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत.

साने गुरुजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. तालुक्यात 152 खेडी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →