तासगाव उच्चारण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील तासगाव एक शहर आहे.तासगावला नगरपालिका परिषद आहे.तासगांव ची नगरपालिका 1858 साली स्थापन झाली आहे.1774 मध्ये नारायण बल्लाळ पेशवे यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांना तासगाव बक्षीस म्हणून दिले होती. श्रीमंत गणपतराव पटवर्धन यांच्या शासनकाळात तासगाव संस्थानाची स्थापना करण्यात आली होता. तासगांवच्या सर्कससिंह परशुराम माळी यांची जगप्रसिद्ध सर्कस होती शहरातील द्राक्षे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध द्राक्षे आहेत.तासगांव शहर वेगाने विकसीत होत आहे. तासगांवचे बेदाणा मार्केट प्रसिद्ध आहे.तसेच तासगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तासगांवचा उजव्या सोंडेचा गणपती खुप प्रसिद्ध आहे. तासगांवला गणपतीचं तासगांव, द्राक्षाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तासगाव
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?