अमल महादेवराव महाडिक हे एक मराठी राजकारणी आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.
हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि पंधराव्या विधानसभांवर निवडून गेले. त्यांनी २०१४ मध्ये तत्कालीन आमदार आणि मंत्री सतेज पाटील यांच्याकडून ही जागा जिंकली.
अमल महाडिक यांचे वडील महादेवराव अप्पा महाडिक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्र विधान परिषदेचे एमएलसी सदस्य आहेत, परंतु २०१५ मध्ये त्यांचा माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडून पराभव झाला. सतेज पाटील यांनी १६५ मतांनी एमएलसी जिंकला. त्यांचे चुलत भाऊ धनंजय महाडिक हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. २०१९ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा शिवसेनेचे खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून २,७०,००० मतांनी पराभव झाला.
अमल महाडिक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?