अपर्णा अतुल घाटे (पूर्वाश्रमीच्या अपर्णा रमेश कुलकर्णी), या एक मराठी लेखिका आहेत. एम.ए. झाल्यावर त्यांना सन २०१३मध्ये विद्यावाचस्पतीची (पीएच्.डी.ची) पदवी मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा विषय 'संत श्री देवनाथ महाराज : व्यक्ती वाङ्मय आणि कार्य' हा होता. .या विषयावरील पुस्तक आता उपलब्ध आहे. या पुस्तकास कोल्हापूर विद्यापीठाच्या संत गाडगे महाराज अध्यासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अपर्णा घाटे यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीची बरीच गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अपर्णा अतुल घाटे
या विषयातील रहस्ये उलगडा.