अनिता कृपलानी-कौल (१९ सप्टेंबर १९५४ - १० ऑक्टोबर २०१६) या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी होत्या, ज्या भारताच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. त्या शिक्षणाच्या हक्काच्या चळवळीतील महत्त्वाच्या व्यक्ती होत्या.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या प्रमुख शिल्पकारांपैकी अनिता कौल एक होत्या. या कायद्यानुसार देशातील प्रत्येक मुलासाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला. भारतातील प्राथमिक शाळांमध्ये "नली काली"('आनंदपूर्ण शिक्षण') या दृष्टिकोनाचा विस्तार करण्याच्या भूमिकेसाठीही त्या प्रसिद्ध आहेत. अनिता कौल यांच्या कार्यकाळातील "नली काली"च्या अध्यापनशास्त्रातल्या नवकल्पनांचे वर्णन भारतीय शिक्षणातील "एक लहान प्रबोधन" असे केले जाते. हा उपक्रम कर्नाटकातील सर्वात 'यशस्वी, नाविन्यपूर्ण आणि क्रांतिकारी' सुधारणा कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखले जातो.
अनिता कौल या न्याय विभागाच्या सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्या. हे पद नागरी सेवेतील कायदा आणि न्याय मंत्रालयातील सर्वोच्च पद आहे.
अनिता कौल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.