अनास्ताशिया सेर्गेयेव्हना पोतापोव्हा (३० मार्च, २००१:सारातोव्ह, रशिया - ) ही एक रशियन वंशाची ऑस्ट्रियाई व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिने १९ जून २०२३ रोजी तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च जागतिक महिला एकेरी क्रमवारीत २१ वे स्थान मिळवले. ५ डिसेंबर २०२२ रोजी ती जागतिक दुहेरी क्रमवारीत ४० व्या स्थानावर पोहोचली होती. पोतापोव्हाने तिच्या व्यावसायिक कारकिर्दीत २०२६पर्यंत तीन महिला टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) एकेरी विजेतेपदे आणि तीन दुहेरी विजेतेपदे मिळवली आहेत. व्यावसायिक स्तरावर पदार्पण करण्यापूर्वी ती कनिष्ठ खेळाडूंमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती, तसेच तिने २०१६ मधील विम्बलडन मुलींचे एकेरी विजेतेपद पटकावले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनास्ताशिया पोतापोव्हा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?