माणूस आपले जीवन जगत असताना कोणती ना कोणती तरी गोष्ट साध्य करीत असतो, तेव्हा तो अमूक एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच त्या दिशेने कार्य करीत असतो. त्याला प्रवासाला जायचे असेल तर गाव, तारीख, वेळ हे निश्चित केल्यावरच हव्या त्या त्या गावाला जाता येते. त्याठिकाणी जायचे स्थळ आणि तिथे गेल्यावर करावयाचे काम ह्या दोहोंचा तपशील माणसाजवळ असणे आवश्यक आहे. ज्यामुळेत कोणतेही कार्य पूर्णत्वास जाते. म्हणून दूर अंतरावर असणाऱ्या लक्ष्याला उद्दिष्ट म्हणतात.
भाषिक उद्दिष्ये ही सर्वसामान्यपणे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चित केली जातात. त्यात विद्यार्थ्यांचे वय, आकलनक्षमता, निरीक्षणक्षमता, लेखनक्षमता, वाढ आणि विकास यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. ही त्या त्या भाषेचे सामान्य भाशिक उद्दिष्ट असतात. भाषेची दोन कार्ये असतात.संबंधित भाषा पूर्णपणे आकलन करून घेऊन त्यातील सर्व बारकावे समजून घ्यावे लागतात. भाषा समजल्यानंतर तिचा दैनंदिन जीवनात वापर करणे गरजेचे असते. आपल्या मनातील विचार भावना, कल्पना किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी समजलेल्या भाषेचा वापर करता येतो. त्यासाठी भाषेच्या क्षमतेचा/उद्दिष्टांचा विकास होणे आवश्यक आहे.
अध्यापनाची भाषिक उद्दिष्ट्ये
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.