अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ - १७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार अणुशक्ती नगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.२०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक ६० ते १११, १२४ ते १७८, १८० ते ५९४, ८०० ते ८०४, ८०६, ८०७, १०४९ ते १०५७, ११९० ते १९९९, १२१४ ते १२२४, १२२७, १२२९, १२३१, ३३०१ आणि ३३०२ यांचा समावेश होतो. अणुशक्ती नगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मोहम्मद इस्लाम मलिक हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.