अजित कौर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अजित कौर

अजित कौर ह्या ज्येष्ठ पंजाबी कथाकार आणि पत्रकार आहे. यांचे लेखन मानवी जीवनातील विसंगती दर्शवून त्यातील वास्तव चित्रण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. त्यांच्या लेखनातून महिलांच्या संघर्षावर आणि समाजाच्या त्यांच्याबद्दलच्या विसंगत वृत्तीवर प्रकाश पडतो तसेच सामाजिक – राजकीय विकृती, सत्तेच्या आणि राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या भ्रष्टाचाराविरूद्धही जोरदार प्रहार आढळतो. त्यांचा जन्म लाहोर येथे झाला. फाळणीपूर्व काळात त्यांचे बालपण लाहोरला व्यतीत झाले. त्यानंतर दिल्ली येथे स्थायिक झाल्यावर त्यांच्या जीवानानुभवाला वेगळे आयाम मिळाले. त्यांनी तिने दिल्ली विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पत्रकारितेला कार्य म्हणून स्वीकारले. रुपी ट्रेडचे (इंडो रशियन ट्रेड) या नियतकालिकाचे त्यांनी सुमारे ३१ वर्ष संपादन केले असून दरम्यान त्या वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी पत्रकार म्हणून लेखन करीत राहिल्या.

अजित कौर यांची पहिली लघुकथा वयाच्या सोळाव्या वर्षी प्रकाशित झाली होती. त्यांच्या सुरुवातीच्या कथांनी स्त्रीवादी भूमिका प्रकट केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →