अक्षय शिवाजीराव कर्डिले

या विषयातील रहस्ये उलगडा.

अक्षय शिवाजीराव कर्डिले (जन्म: ४ मे १९९६) हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील एक प्रमुख युवा राजकीय नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) राहुरी विधानसभा मतदारसंघाचे 'विद्यमान आमदार' आहेत. त्यांचे वडील, दिवंगत आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. वडिलांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत (मे २०२६) त्यांनी १, १२, ५८७ पेक्षा जास्त मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि ते आमदार पदावर विराजमान झाले.



महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक राजकारण्यांप्रमाणे, अक्षय कर्डिले हे देखील एका राजकीय घराण्यातील आहेत . ते ज्येष्ठ राजकारणी आणि सहा वेळा आमदार राहिलेले , भारत सरकारचे माजी मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री यांचे सुपुत्र आहेत. स्वतः कोणतीही निवडणूक न लढविलेले अक्षय नवखे असले तरी वयाच्या ३० व्या वर्षी मे २०२६ मध्ये पार पडलेल्या पोटनिवडणूकीतील विजयाने मताधिक्याचा विक्रम केलाच पण विरोधकाचे पुरते पानिपत केले.राहूरी विधानसभा मतदारसंघाचे तरुण आणि लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख केली जाते.



आमदार होण्यापूर्वी अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचीही धूरा मोठ्या जबाबदारीने सांभाळली आहे.

अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून थेट आमदार पदापर्यंत पोहोचलेले तरुण आमदार ठरले आहे.

भाजप युवा मोर्चातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत भाजपने त्यांना मे २०२६ च्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांनी ही निवडणूक जिंकून थेट विधानसभेत प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →