प्रदेशाध्यक्ष: धर्मवीर आध्यात्मिक सेना, संपादक : मासिक - वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र ),
संस्थापक / अध्यक्ष : वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र
कार्यकारी संचालक : महा एनजीओ फेडरेशन
ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा . लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून आध्यात्मिक संस्काराचे बाळकडू . शालेय प्राथमिक शिक्षण ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई येथे तर माध्यमिक शिक्षण अनुक्रमे तेरणा महाविद्यालय , कोपरखैराणे व रयत शिक्षण संस्था वाशी गाव येथील विद्यालयात . महाविद्यालयीन शिक्षण हे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ,खारघर येथे . बालवयात मातु:श्री मुळे ब्रह्मलीन सद्गुरू बेळगावच्या कृष्णभक्त श्री कलावती देवी यांच्या सत्संगाची आवड . नियमित बलोपासना तथा आदि संत वाड्मयाचे वाचन मनन .शालेय शिक्षण घेतानाच देगलूरकर परंपरेचे निष्ठावंत तथा वै.श्रीधुंडामहाराज देगलूरकर यांचे शिष्य श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या कीर्तनाचा बालमनावर परिणाम . गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण . शास्त्रीय गायन तथा पखवाज वादन यांचे शिक्षण . प.पू.श्रीगुरू ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, प.पू.श्रीगुरू ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांचे पारमार्थिक क्षेत्रात प्रमुख मार्गदर्शन .सद्गुरू प.पू. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तन श्रवणाची आवड .सन २०१४ पासून मासिक वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र ) याचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत . इंटरनेटच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व त्यातील संतसाहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्नशील . नियमित पणे वारकरी संप्रदाययुवा मंचच्या ब्लॉग द्वारे लिखाण . वारकरी संप्रदाय संदर्भात अनेक मुलाखती . पंढरपूर वारी दरम्यान दूरदर्शन-सह्याद्री .ऋषी पंचमी निमित्त दूरदर्शन-सह्याद्री वरील मुलाखत वाहिनीवर अनेक मुलाखती . वारी आणि सोशल मिडिया यांवरील झी २४ तास वरील विशेष मुलाखत . वारकरी संप्रदाय व त्यातील कार्याविषयी लोकमत,प्रहार (वृत्तपत्र),सकाळ (वृत्तपत्र),पुढारी (दैनिक) आदींद्वारा लेख तथा कार्याचा गौरव विवध वृत्त प्रसिद्ध . महाराष्ट्रातील विविध भागात अखंड हरीनाम सप्ताहांचे आयोजन प्रामुख्याने श्रीक्षेत्र गोंदवले खुर्द येथील गोकुळ अष्टमी उत्सव , खारघर- ओवे गाव , बिजवडी माण , मोगराळे , फलटण,म्हसवड,उरळी कांचन येथील रामनवमीउत्सव तथा नाम यज्ञ उत्सव . कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र तथा अन्य राज्यात ही स्त्रीशिक्षण,व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य उत्तुंग कार्य . वारकरी संप्रदाययुवा मंचच्या माध्यमातून उच्च शिक्षित तथा सुसंस्कारिक युवांचे संघटन . मासिक - वैष्णव दर्शनच्या माध्यमातून अनेक विशेष अंकांचे प्रकाशन . सातारा जिल्ह्यातील भव्य आशा असणाऱ्या आई महोत्सवचे जनक . सोशल मिडियाच्या माध्यमातून वारीची माहिती जगभरात पोहचवण्यासाठी अक्षयवारी ची निर्मिती . व्हाट्सअप्पच्या माध्यमातून नियमित हाजरो लोकांना आपल्या स्मार्टफोन वर आपल्या शेकडो सहकाऱ्यांच्या मदतीने संत साहित्यिची माहिती पोहचवणारे व्यक्तिमत्त्व . वारकरी संप्रदाय आंदोलन सक्रिय व महत्त्वपूर्ण सहभाग
अक्षय महाराज भोसले
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.